fbpx

ज्यांना कोणाला एकनाथरावांचे यांचे विचार ऐकायचे आहेत, त्यांनी बीकेसीला जावे – अजित पवार

पुणे : शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यास परवानगी देऊन शिक्कामोर्तब केले आहे. त्यावर ज्यांना कोणाला एकनाथरावांचे यांचे विचार ऐकायचे आहेत, त्यांनी बीकेसीला जावे,. ज्यांना कोणा ठाकरेंचे विचार ऐकायचे असतील त्यांनी शिवतेर्थावर जावे, असा टोला विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत जेव्हा मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच मला गृहमंत्री करायला पाहिजे असे वक्तव्य अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर केले. त्यावर अजित पवार म्हणाले, गृहमंत्रीपदाबाबत गमतीने बोललो, सभा घेताना सभेत मजा यावी बोललो होतो. हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी बोललो होतो, मिडीयासाठी नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतात तेच खाते घ्यावे लागते. १९९९ पासून आजपर्यंत मला जी जबाबदारी दिली ती पार पाडली. सर्वच खाते महत्त्वाचे असतात, असे अजित पवार म्हणाले.

एका दिवशी शिंदे व शिवसेनेची सभा होणार असल्यामुळे माध्यमांची तारांबळ उडणार आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, मला फक्त काळजी माध्यमांची आहे. एकाचवेळी सभा सुरू झाली तर अर्धे इकडे, अर्धे तिकडे होऊन कुणाला दाखवायचं हा प्रश्न येईल. अर्थात माध्यमं त्यात तरबेज आहेत. आम्ही कालही बघितलं. दिल्लीची सभा दाखवायची की इकडची सभा दाखवायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यातून माध्यमं मार्ग काढू शकतात, असं अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: