Sunday, September 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

तुषार हंबीर हल्ला प्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित

पुणे: हिंदू राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष ३ सप्टेंबरला तुषार हंबीरवर ससून रुग्णालयामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता.
हल्ला करणाऱ्या व्यक्ती अज्ञात होत्या. दरम्यान, हंबीर याला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी या हल्यात गंभीर जखमी झाले होते.
रुग्णालयात हंबीरला बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस पोलीस शिपाई पांडुरंग भगवान कदम, पोलीस शिपाई राहुल नंदू माळी आणि सिताराम अहिलू कोकाटे या कोर्ट कंपनीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केलं आहे. तुषार हंबीर हल्ला प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून त्यांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी केली आहे.
खून आणि खूनाच्या अनेक गुन्ह्यात तुषार हंबीर हा सध्या येरवडा कारागृहात होता त्याला वैद्यकीय उपचारासाठी 28 ऑगस्ट पासून पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तुषार हंबीर याच्यावर पाच तारखेला रात्री दहाच्या सुमारास तलवार आणि पिस्टल घेऊन अक्षय ओव्हाळ आणि त्याच्या साथीदारांनी केला होता हल्ला.
हल्ल्यादरम्यान पोलीस शिपाई पांडुरंग कदम सिताराम कोकाटे आणि राहुल माळी हे तुषार हंबीरऱ्याच्या बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस शिपाई होते गैरहजर, हल्या दरम्यान निलंबीत पोलिस हे आपल्या कर्तव्यावर आढळून आले नसल्याने उपायुक्तांने हलगर्जी पणाचा ठपका ठेवत ३ पोलिस शिपायांना केलं निलंबीत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading