fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती मतदारसंघ युवक काँग्रेसच्या वतीने आढावा बैठक


पुणे: आगामी महानगरपालिका निवडणुका या काँग्रेस स्वबळावर लढणार असून. त्यामुळे पुण्यात काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. पर्वती मतदारसंघ युवक काँग्रेसच्या वतीने आज सुहाग मंगल कार्यालय बिबवेवाडी पुणे येथे आढावा मिटींगचे आयोजन पर्वती युवक काँग्रेस अध्यक्ष माननीय केतन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. 

या मिटींगसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस (पुणे शहर युवक काँग्रेस प्रभारी) माननीय दीपाली ससाणे यांच्या मार्गदर्शन व प्रमुख उपस्थतीमध्ये घेण्यात आली. यावेळी ताईंनी कार्यकर्ताना मार्गदर्शन करताना असे म्हणले की येणाऱ्या काळामध्ये गाव असेल प्रभाग असेल वार्ड किंवा वस्ती पातळीवर युवक काँगसची शाखा हा संकल्प माननीय युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणालदादा राऊत यांची संकल्पना माझी गाव माझी शाखा ही राबवायची आहे येणाऱ्या काळामध्ये महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरायची वेळ जरी आली तरी उतारायचे आहे.आणि आपल्या नेत्या सोनिया गांधी, राहुल  गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी युवक काँग्रेस मजबूत झाली पाहिजे. सगळे विसरून युवकांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये एकत्र येण्याची गरज आहे आपले नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून या देशातील नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत संपूर्ण देशभर पदयात्रा करत आहे या यात्रेमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे अशाही त्यांनी सूचना दिल्या.

या आढावा मिटींगला पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुलजी शिरसाठ, उपाध्यक्ष सौरभ अमराळे, आशिष वेव्हारे, संतोष पाटोळे, स्वप्निल नाईक, सनी रणदिवे, ऋत्विक धनवत, नरसिंह सूर्यवंशी, अक्षय सागर, पर्वती विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत देशमुख, ओंकार भालेराव, बाळा घुले, कुणाल भोसले, अजित कोळेकर तसेच उर्मिला कदम, सुमित नेटके, अभिषेक ननावरे व इतर युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पर्वती मतदार संघाचे युवक अध्यक्ष केतन जाधव यांनी दिपालीताई ससाने व शहर अध्यक्ष राहुलजी शिरसाठ यांचा सत्कार करून मिटींगला उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading