Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

राज्यपाल नियुक्त 12 आमदारा बद्दल प्रश्न विचारताच राज्यपालांचा काढता पाय

पुणे : राज्यपाल भगतसिंग आज पुणे दौऱ्यावर आहेत. तेव्हा त्यांनी महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या योगदानबाबत जाणून घेतले. त्यांच्या निवासस्थानाला भेट दीली. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या  नियुक्ती बाबत प्रश्न विचारला असता राज्यपालांनी उत्तर देणे टाळले. तसेच तेथून काढता पाय घेतला.

वास्तविक महाविकास आघाडी सरकार मध्ये 12 आमदारांची यादी ही राज्यपालांना देण्यात अली होती. मात्र अद्याप त्या यादीवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

दरम्यान, महर्षी कर्वे यांच्या निवासस्थानाला भेट दिल्यावर राज्यपाल म्हणाले, महर्षी कर्वे यांनी भारतात युगांत कार्य केले आहे. तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षणमध्ये त्यांनी मोठं योगदान दिले आहे. भारत स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आणि समाजच्या माध्यमातून कर्वे यांचा योगदान पुढे चालवत आहे. माझी अनेक दिवसाची इच्छा होती की मी महर्षी कर्वे यांच्या राहणाऱ्या ठिकाणाला भेट द्यावी आज येथे येवून मला आनंद झाला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading