Wednesday, October 28, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेतर्फे शेखर मुंदडा यांचा विशेष सेवा पुरस्काराने गौरव 

पुणे : महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेतर्फे  समाजासाठी विशेष कार्य केल्याबद्दल  देण्यात येणाऱ्या विशेष सेवा पुरस्काराने पुण्यातील शेखर मुंदडा यांचा गौरव करण्यात आला. शेखर मुंदडा हे महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातूज समाजातील अनेक सामाजिक संस्था व वंचित घटक यांच्यासाठी महत्वपूर्ण कार्य करत त्यांना मदत करत आहेत.
माहेश्वरी सभेतर्फे इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी  राष्ट्रीय अध्यक्ष श्याम सोनी यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी आणि  सल्लागार हिरालाल मालू, सरचिटणीस संदीपजी काबरा, संघटन मंत्री शैला कलंत्री, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने जितेंद्र बिहाणी यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुण्याचे अध्यक्ष  गोविंदजी मुंदडा आणि सचिव  शेखर सारडा,  स्वाती मुंदडा व दर्शन मुंदडा, सतीश डाल्या असे पारिवारिक सदस्य देखिल यावेळी उपस्थित होते.
सामाजिक संस्था सक्षमीकरण व सामाजिक कार्यकर्ते यांना बळ देण्यासाठी प्रत्येक महिन्यात  नानाविध  सामाजिक उपक्रम महाराष्ट्रभर १०० हुन अधिक  ठिकाणी ते राबवित असतात. याच कार्याची विशेष  नोंद घेत त्यांना माहेश्वरी सभेकडून शेखर मुंदडा यांना  विशेष सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
शेखर मुंदडा म्हणाले, सदर पुरस्कार हा माझे गुरुदेव श्री श्री रविशंकर, महा  एनजीओ फेडरेशनचे सर्व संचालक व माझे मार्गदर्शक चंद्रकांत राठी, माझा परिवार व मित्र समुदाय यांना समर्पित करतो. सामाजिक कार्याची अधिक जबाबदारी यामुळे वाढली असून महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्य करण्यास अधिक बाळा मिळाले आहे. सामाजिक संस्था यांना  सक्षम करून राज्य व देश सक्षमीकरणाकडे पाऊल टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply