आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती भाजपच जिंकणार -राम शिंदे
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघ २०२४ मध्ये जिंकण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने आराखडा तयार केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पण बारामती दौऱ्यावर जाऊन आले. आता 22, 23 ,24 सप्टेंबरला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. आता तिथे कमळ फुलवणारच असा निर्धार भाजपचे आमदार राम शिंदे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 22, 23, 24 सप्टेंबरला बारामती दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्याचीसविस्तर माहिती देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला भाजपचे माजी मंत्रीबाळा भेगडे,पक्षाचे राज्यातील निवडणूक विभाग प्रमूख सूनील कर्जतकर, ,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व अन्य पदाधिकारी यावेळी ऊपस्थित होते.
अमेठी सारखा लोकसभा मतदार संघ, ज्याने देशाला इतके पंतप्रधान दिले, तो मतदारसंघही भाजपने काबीज केला, त्यासमोर बारामती लोकसढा मतदार संघ काहीच नाही असे रामशिंदे म्हणाले.
पक्षाने मागील लोकसभा निवडणूकीत दुसर्या क्रमाकांवर असलेले देशातील १४४ मतदार संघ केंद्रीय मंत्र्यांना दिले आहेत. त्यात राज्यातील १६ आहेत. त्यातील २ पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापैकी बारामतीला लक्ष्य करण्यात आले आहे. मागील वेळी माजी मंत्री हर्षवर्धन.पाटील आमच्यासमवेत नव्हते. यावेळी ते आमच्याबरोबर आहेत याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
त्यांची लाखभर मते आमच्याकडे असली असती तर मागच्या वेळीच आम्ही बारामतीत जिंकलो असतो .असे राम शिंदे म्हणाले.
राम शिंदे म्हणाले,भाजपचे विशेष लक्ष केंद्रित १४४ पैकी १६ मतदार संघ महाराष्ट्रात आहेत.तीन दौरे केले जनतेचा आवाज भाजपच्या पाठीशी आहेत भाजप विचारावर काम करते दिलेला कार्यक्रम योग्य पद्धतीने राबविणार आहोत. असे राम शिंदे म्हणाले.
राम शिंदे म्हणाले,हा पवारांचा बालेकिल्ला वगैरे समजले जाते. पण तसे नसते हे आम्ही अमेठीत दाखवून दिले. बारामतीत सन २०१४ ला ६८ हजार मतांनी हरलो. सन २०१९ ला दीड लाख मतांंनी हरलो पण आमची मते ८० हजारांनी वाढली. आता यावेळी आम्ही १८महिने आधी काम सूरू केले आहे. निर्मला सितारामन यांचे २१ कार्यक्रम ३, दिवसात वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघात होतील अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.
