Friday, September 11, 2026
Latest NewsPUNE

‘चक्र’ बांबूच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन

पुणे  – लोणी काढणाऱ्या ताकाच्या रवीपासून ते अवकाशात उडणाऱ्या विमनापर्यंत, चक्राची मानवाच्या आयुष्यातील उन्नती दाखवणाऱ्या अनेक अनोख्या गोष्टींच्या बांबूतील प्रतिकृती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. जागतिक   बांबू दिनाचे औचित्य साधून “चक्र” ह्या तीन दिवसीय प्रदर्शन घोले रोड येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे भरविण्यात आले आहे. जे.जे. महाविद्यालयातील कला शाखेतून उत्तीर्ण झालेले रमेश दाते, हे गेली ४० वर्षे बांबू सारख्या आव्हानात्मक विषयात अभ्यास आणि वाखाणण्याजोगे काम करत आहेत. त्यांनी साकारलेल्या विविध बांबूरुपी प्रतिकृतींचे प्रदर्शन सोमवार १९ व  मंगळवार,  २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ८ पाहण्यास उपलब्ध आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वनराईचे सचिव अमित वाडेकर यांच्या हस्ते झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading