विरोधकांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायचं नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर स्थगितीमुळे एमआयडीसीत 138 प्रकल्प अडकल्याचे आरोप विरोधक करत आहे. यावर विरोधकांना कुठलीही माहिती नाही. कोणतीही माहिती न घेता ते बोलत आहे. अशा विरोधकांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायचं नाही.असे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणीवस पुणे येथे 12व्या छात्र संसदेत आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणीवस म्हणाले ,जलयुक्त शिवाराच्या ज्या चौकशी सुरू होत्या. त्या आता बंद होणार का? जिथे गडबड आहे, ती कोणतीही चौकशी थांबणार नाही. मात्र, ज्या ठिकाणी राजकीय हेतू असेल, अशा चौकशी बंद केल्या जाणार आहे.असे
देवेंद्र फडणीवस म्हणाले.
नांदेडमध्ये पोलीस भरती प्रशिक्षकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्काबुक्की केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर तिथं लाठीचार्ज झाल्याचंही वृत्त आहे.यावर आता खुद्ध फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, पोलीस भरती प्रशिक्षकांनी नांदेडमध्ये धक्काबुक्की केली असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मला माहीत नाही, कोणती माध्यमं तिथं होती. मात्र, मला कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की झाली नाही. तिथं कुठलाही लाठीचार्ज झाला नाही.असे देवेंद्र फडणीवस म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार सारखे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणीवस यांच्या वर सारखे आरोप करत राहतात.यावर त्यांना भरपूर वेळ आहे.त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायला मला वेळ नाही अशी फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की भय आणि भष्ट्राचाराच्या जोरावर भाजप लोकशाही विकत घेतंय. यावर नाना पटोले यांना असे झटके येत असतात. ते काहीही बोलतात, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
