Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे ‘आयजीबीसी सस्टेनेबल स्टॉल’ पुरस्काराचे वितरण

पुणे : क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे आयोजित २१ व्या ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’च्या दुसऱ्या दिवशी ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने ‘सस्टेनेबल स्टॉल’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये गंगोत्री होम्स, अतुल इंटरप्रायझेस आणि रोहन बिल्डर्स यांनी अनुक्रमे लघु, मध्यम आणि मोठ्या आकारातील स्टॉल प्रकारात पहिले स्थान मिळविले.

इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल, पुणे चाप्टर (आयजीबीसी ) आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्यातर्फेदेण्यात येणारा हा पुरस्कार बँक ऑफ बडोदा’चे मुख्य महाव्यवस्थापक आर मल्होत्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर, प्रदर्शनाच्या आयोजन समितीचे मुख्य समन्वयक जे. पी. श्रॉफ हे उपस्थित होते.

याबाबत आयजीबीसी पुणे चाप्टर’च्या सह अध्यक्षा डॉ. पूर्व केसकर म्हणाल्या, “ बांधकाम क्षेत्रात ग्रीन बिल्डिंग संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही या पुरस्काराचे आयोजन केले आहे. प्रदर्शनात सहभागी ९० स्टॉल्स’ला भेट ‘वस्तूंचा पुनर्वापर, किमान उर्जा वापर, माहिती देण्यासाठी पेपरचा किमान वापर आणि हरित संदेश या निकषांच्या आधारावर त्यांची पाहणी करण्यात आली. यापैकी १२ स्टॉल्स’ची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. या पैकी ६ स्टॉल्स’ला  लघु, मध्यम आणि मोठ्या आकारातील  स्टॉल प्रकारात प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये लघु स्टॉल प्रकारात गंगोत्री होम्सला प्रथम, तर गोयल प्रॉपर्टीज’ला द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मध्यम स्टॉल प्रकारात अतुल इंटरप्रायझेसला प्रथम तर आदित्य बिल्डर्स’ला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. तसेच मोठ्या आकारातील स्टॉल प्रकारात रोहन बिल्डर्स’ला प्रथम आणि नाईकनवरे  प्रॉपर्टीज’ला द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.’’

प्रदर्शनात यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) सहभाग घेण्यात आला आहे. याबाबत एमटीडीसीच्या  प्रादेशिक व्यवस्थापक मौसमी कौशिक म्हणाल्या, “ यंदा प्रथमच आम्ही या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. एमटीडीसीच्या राज्यातील २९ पर्यटन स्थळांवरील निवासस्थानांबाबात आम्ही या प्रदर्शनात माहिती देत आहोत आणि नागरीकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading