Sunday, September 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

ही भूमिका माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे: ऐश्वर्या नारकर

झी मराठी वाहिनीवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हि नवीन मालिका १२ सप्टेंबर, रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ह्या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आपल्याला एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.  या मालिकेबद्दल व आपल्या प्रवासा बद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा झी मराठीवर काम करण्याची संधी मिळत आहे, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे, ह्या मालिकेच्या गोष्टीत गूढ रहस्य आहे, तशीच ती प्रेक्षकांना भावेल अशी कौटुंबिक गोष्ट ही आहे.  आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेबद्दल सांगता येईल. मला ही  मालिका करताना खूप छान वाटतंय. या मालिकेमध्ये माझी व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे, मी यापूर्वी कधीही अशी भूमिका साकारली नव्हती, त्यामुळे या नवीन व्यक्तिरेखेमध्ये प्रेक्षकांसमोर येताना आनंद वाटतोय. या मालिकेत मी नायकाच्या सावत्र आईची भूमिका साकारतेय. या भूमिकेला मालिकेत लवकरच नवीन वळण येणार आहे, आणि ते प्रेक्षकांसाठी उत्सुकता आणि उत्कंठा वाढवणारा असेल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading