Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Vedanta – Foxcon प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला नको होता – शरद पवार


पुणे : वेदांता प्रकल्प गुजरातला शिफ्ट करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला नको होता.पण आता तो गेला आहे. यावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. असं शरद पवार म्हणाले.

‘वेदान्त-फॉक्सकॉन’संदर्भात प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले,हा प्रकल्प तळेगावला येणार होता. त्याची चर्चा झाली होती. राज्य सरकारने आवश्यक त्या निर्णयाची तयारी केली होती. पण नंतर यात बदल झाला. त्यात आता काही पर्याय मला दिसत नाही. असे शरद पवार म्हणाले.
हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्यात येत आहे. पण सामंत, शिंदे हे आमच्या सरकाच्या वेळेस मंत्री होते, त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करणे योग्य नाही .असाही टोला शरद पवार यांनी
शिंदे व फडणविस सरकारला लगावला आहे. त्याचबरोबर, नरेंद्र मादी यांनी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी मदत केली तर त्यांच्या भुमिकेचे आम्ही स्वागत करू. असेही शरद पवार म्हणाले.

पण सध्याच्या स्थितीवरून असं दिसतंय की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणं शक्य नाही. त्याच्या बदल्यात मोदींनी मोठा प्रकल्प देण्याचं आमिष हे रडणाऱ्या पोराला फुग्याचं आमिष दाखवल्यासारखं आहे. असा टोला पवारांनी लावला आहे.
मोदी शाहा यांचं सरकार केंद्रात सत्तेत असल्यामुळे त्या सत्तेचा फायदा गुजरात सारख्या राज्यांना होतो. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे गुजरातमध्येच सर्वांत जास्त दौरे झाले आहेत. त्यामुळे आता या विषयावर चर्चा करण्याला काही अर्थ नाही. यानंतर जास्तीत जास्त प्रकल्प राज्यात कसे येतील यावर सरकारने लक्ष द्यावं असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, “महाविकास आघाडीने यावर काही निर्णय घेतला नाही असा आरोप करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे होते. तरीही ते असं बोलतात. फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाला अर्थ नाही. केंद्राची सत्ता हाती असण्याचे अनुकूल परिणाम काही राज्यांवर होत असतात. त्यामध्ये गुजरात आहे असं शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading