फॉक्सकॉन कुठे गेला, यापेक्षा आपलं हक्काचं होतं ते गेलं हे दुर्दैवी – खासदार सुप्रिया सुळे
पुणे: भविष्यातील औद्योगिक विकासात आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रोजेक्ट गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सर्व प्रक्रिया झाली होती, असं ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. शिंदे फडणवीस सरकारमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे असा आरोप होतो आहे. त्यावर खुप दुर्दैवीची गोष्ट आहे.महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रोजेक्क्ट मिळत असेल तर ठीक पण महाराष्ट्राचा प्रोजेक्ट तिकडे गेला. त्यामुळे लाखो तरुणाच्या नोकऱ्या जाणार आहेत.राज्य सरकारला विनंती आहे.हा विषय राजकीय करू नका,सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढल पाहिजे.कुठल्याही राज्यात जावं काही हरकत नाही पण आपलं हक्काच होत ते गेल्याने दुर्दैवी आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
सुप्रिया सुळे आज पुणे विद्यापीठात तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते त्यास उपस्थिती लावली होती. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
फॉक्सकॉनचा प्रकल्प फडणवीस व शिंदे सरकारमुळे गुजरातला गेला असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,फॉक्स मुख्यमंत्री हवा,नसेल तर दोन मुख्यमंत्री करावे या सरकारने असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हाऊस व्हिजिटिंग बंद करून फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.लक्ष द्यावे.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी इतर दौरे रद्द करून या गांभीर प्रश्नी चर्चा करावी. जवळपास एक लाख नोकऱ्या जातील. यात महाराष्ट्राच नुकसान होणार आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
