सुप्रिया सुळे म्हणतात, अजितदादाला मुख्यमंत्री करा, एकनाथ शिंदे आम्ही तुम्हाला केंद्रात दुसर मोठ पद देऊ
पुणे: वेदांत फॉक्सकॉन ग्रुप चा प्रोजेक्ट महाराष्ट्रामधून गुजरात येथे गेल्याने राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील स.प.महाविद्यालया बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
50 खोके युवकांना धोके अशी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
तुम्हाला दुसरा मोठा प्रकल्प दिला जाईल.असा फोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सांगितली आहे. त्यावर मी एकनाथ शिंदे यांना विनंती करते.तुमच पद थोडे दिवस दादाला द्या.आम्ही तुम्हाला दुसर पद देऊ,ते तयार आहेत का ? अजितदादाला मुख्यमंत्री करा,एकनाथ शिंदे यांना आम्ही केंद्रात दुसर मोठ पद देऊ.दादाला त्यांनी मुख्यमंत्री कराव. अशी मागणी राष्ट्रवादी सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, जशी त्यांना ऑफर मिळाली.तशी एकनाथ शिंदे यांना ऑफर देत असल्याच सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,आपल्या राज्याच्या मेरिटमुळे वेदांत फॉक्सकॉन ग्रुप येणार होता.त्यातून जवळपास दीड लाख तरुणाच्या हाताला रोजगार मिळणार होता. तसेच 2 लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. यामुळे आपल राज्य प्रगती पथावर गेले असते.मात्र आता खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासाला ब्रेक बसला आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने विमानाने दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करावी.ज्या मेरिटने तो प्रकल्प आमच्याकडे आला होता.तो आमच्याकडेच रहावा अशी मागणी करावी. अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.
