Sunday, September 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

यंदा करुणा मुंडे घेणार भगवान गडावर दसरा मेळावा  

पुणे : राज्यात एकीकडे दसरा मेळाव्याबाबत शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील दसरा मेळावा घेत असतात. पण आत्ता करुणा मुंडे यांनी देखील भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याच त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आत्ता राज्यात दोन्ही दसऱ्या मेळाव्याबाबत राजकारण तापण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे व्याज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. करूणा मुंडे म्हणाल्या, मी देखील वंजारी समाजाची सून आहे. अन् मुंडेच्या एकुलत्या एक वंशाचा दसऱ्याच्या दिवशी वाढदिवस असल्याने मी देखील भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे.

पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, गेल्या सात ते आठ वर्षापासून भगवान गडावर दसरा मेळावा होत नाहीये. जी दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली आहे ती परंपरा मी यंदा परत सुरू करणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading