मनसे नेते वसंत मोरे यांचा ‘चंद्रा’ गाण्यावर झिंगाट डान्स
पुणे :मनसे नगरसेवक वसंत मोरे हे वेगवेगळ्या कारणांमुळे या वर्षी चर्चेत राहिले आहेत. आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत त्यांनी जबरा ठुमके लगावले आहेत. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन वसंत मोरे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हीच्या चंद्रमुखी सिनेमातील प्रसिद्ध चंद्रा या गाण्यावरच वसंत मोरे यांना ठेका धरला होता. मिरवणुकीत ट्रॅक्टरवर चढलेल्या वसंत मोरे यांचा नाचतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात गाजतो.
कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या थाटामाटत होत असलेल्या गणपती विसर्जनाचा शुक्रवारी उत्साह पाहायला मिळाला. दोन वर्षांनी कोणत्याही बंधनाविना गणेशभक्तांनी विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला. यावेळी मिरवणुकीत डीजे, ढोल, यांच्या तालावर गुलालाची उधळण करत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं होतं.
पुण्यातही गणपती मिरवणुकीचा आनंद आणि उत्साह यावेळी पाहायला मिळाला. यात पुण्याचे मनसे नगरसेवक आणि नेते वसंत मोरे यांच्या डान्सची सोशल मीडियात आता चर्चा रंगली आहे. ‘बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा…’ असं कॅप्शन देत वसंत मोरे यांनी गणपती मिरवणुकीतला व्हिडीओ फेसबुकवरुन शेअर केला आहे. आतापर्यंत 18 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय.
