शिवसेने सोबतच्या युतीनंतर संभाजी ब्रिगेडमध्ये बहुसंख्य प्रवेश
सिंदखेड राजा :संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती नंतर पुढील राजकीय दशा, आणि दिशा ठरवण्यासाठी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष . मनोज आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर, मुख्यप्रवक्ते गंगाधर बनबरे सर, वरीष्ठ पदाधिकारी व केंद्रीय कार्यकारणी मान्यावरांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय सिंदखेडराजा येथे पहिली बैठक संपन्न झाली महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेड चे सर्व जिल्हाध्यक्ष व असंख्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी अनेकांनी संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिली.
