Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन घेतले बाप्पाचे दर्शन

पुणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. यानंतर आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

यावेळी अजित पवारांनी नाना पाटेकर त्यांच्या फॉर्म हाऊस मधील शेजारी असलेल्या शेतामध्ये फेरफटका मारला. तसेच  नाना पाटेकर यांच्यासोबत मनसोक्त गप्पाही मारल्या. दरम्यान अजित पवार आज पुण्यातील विविध गणेश मंडळाना भेट देणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading