शिंदे गटाची जी ओरिजनल शिवसेना आहे ती आमच्याबरोबर आहे -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे का शिंदे गटाची आहे. याचा निर्णय सुप्रीम कोर्टात अजून प्रलंबित आहे. निर्णय 27 तारखेला होणार आहे. त्यावर शिंदे गटाची जी ओरिजनल शिवसेना आहे ती आमच्याबरोबर आहे बाकी उरलेले शिवसेनेचे आम्हाला माहीत नाही . असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर उतरल्यानंतर माध्यमांशी बोलताना केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आजचा दौरा हा राजकीय नसून राजे उमाजी नाईक यांना आदरांजली देण्यासाठी हा दौरा आहे रामोजी समाज हा नेहमीच वंचित राहिलेला आहे त्यामुळे नवीन सरकार या रामोशी समाजासाठी काहीतरी करू इच्छितो आणि त्याच निमित्ताने रामोजी समाजाच्या अडीअडचणी आणि त्यांच्या समस्या जाणण्यासाठी मी आज तिथे चाललो आहे असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
शिवसेना नक्की कोणाची आहे याचा निर्णय 27 तारखेला होणार आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले,सुप्रीम कोर्टच्या सुनावणीत चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आलीय.याबाबत मला माहिती नाहीय, तुम्ही मला सांगतायत, सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत जबाबदारीने बोललं पाहिजे, माहिती घेऊन बोलणार, कोर्टात केस असताना बोलणं योग्य नाही. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपने बारामती ताब्यात घेण्यासाठीबारामती मिशन चालू केले काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत जनतेची संवाद साधला. निर्मला सीताराम बारामती ला जाणार आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले,आमचं मिशन भारत इंडिया आहे, बारामती महाराष्टात बाहेर नाही, मिशन महाराष्टाअंर्तगत बारामती आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येतं त्याच्यामुळे बारामती हे वेगळं नाही . असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजप येणाऱ्या महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत किती जागा लढवणार हे विरोधी पक्ष विचारत आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले,आम्ही जागां किती लढाव्याच्या ते ठरवू तुम्ही पंतगबाजी करू नका. असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला.
कुठलीही निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे, असं समजून झोकून द्यावं लागतं. त्यावेळी ती निवडणूक आपल्याला जिंकता येते. हे केवळ मुंबई महापालिकेबद्दल नव्हतं. तर एकूणच निवडणुकीच्या धोरणाबद्दल होतं, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आमचा हैदराबाद नाही मिशन मुंबई आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
