नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या सूर्य रथाचे पुनीत बालन यांच्या हस्ते उदघाटन
पुणे : बुधवार पेठेतील तपकीर गल्ली मधील नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या वतीने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत साकारण्यात आलेल्या सूर्य रथया देखाव्याचे उदघाटन प्रसिद्ध उद्योगपती तसेच श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट चे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मंडळाचे नितीन राऊत ,अविनाश वाडकर,शेखर बेहेरे ,पुष्कर तुळजापूरकर,निलेश राऊत ,कपिल राऊत ,प्रसाद तुळजापूरकर,नागेश नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
या देखाव्याविषयी माहिती देताना ट्रस्ट चे विश्वस्त पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले की’स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ट्रस्ट ने यंदा तब्बल ७५ हजार एल ई डी दिव्याचा सूर्य रथ साकारला आहे ट्रस्ट च्या सर्व कार्यकर्त्यानी तीन महिने हा रथ उभारणी करता कष्ट घेतले हा रथ टिळक रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीत सामील होणार आहे तसेच ज्ञान प्रबोदिनी चे बरची पथक वादन करणार आहे ट्रस्ट चे यंदा ८१वे वर्ष असून गणेशोत्सव, शिवजयंती अशा उत्सवाबरोबर मंडळ वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविते ज्या मध्ये विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत सुमारे 2000 विद्यार्थी आज शिकत आहे या शिवाय आरोग्य शिबिरे,करियर मार्गदर्शन ,रोजगार मेळावे आदी उपक्रम ट्रस्ट च्या माध्यमातून राबविले जातात असे ही तुळजापूरकर यांनी सांगितले
