Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

उपनगरातील गणेश मंडळांना १२ पर्यंत परवानगी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : धायरी उपनगर येथील मंडळांना रात्री १२ पर्यंत स्पीकर्सला परवानगी मिळावी यासाठी येथील कार्यकर्ते प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धायरी उपनगर परिसरातील गणेश मंडळांना ही परवानगी दिल्याने येथील मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल जवळील संकल्प मित्र मंडळास भेट दिली देवून बाप्पांची आरती केली. यावेळी शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, खासदार श्रीरंग बारणे, उपशहर प्रमुख निलेश गिरमे, संकल्प प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राधिका दशरथ गिरमे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी पुणे जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेटी व गणेश दर्शन यांचे नियोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत खडकवासला मतदार संघातील सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथील संकल्प मित्र मंडळास भेट दिली.

धायरी उपनगरात प्रथमच शिवसेनेचे मुख्यमंत्री दाखल

नवे सरकार स्थापन झाल्यानंतर खडकवासला मतदार संघातील मोजक्याच कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यापैकी एक असणारे उपशहर प्रमुख निलेश गिरमे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रित केले होते. शिंदे यांनी ही विनंतीला मान देत, संकल्प मित्र मंडळास भेट दिली. कोणताही शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री धायरी उपनगरमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आसल्याने, परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading