Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

त्रिनयना देवीचा कृपा आशीर्वाद, वरदान प्राप्त झालेली “नेत्रा”

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी ‘ हि नवीन मालिका १२ सप्टेंबर २०२२ पासून, सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता  झी मराठीवर  सुरु होणार आहे. या मालिकेत तितिक्षा तावडे मुख्य भूमिका साकारत आहे. तितिक्षाने तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे अनेक मालिकांमध्ये व  चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. या मालिकेबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल बोलताना तितिक्षा म्हणाली, “ही मालिका एक वेगळी रहस्यमय आणि गूढ कथा घेऊन येत आहे.

या मालिकेबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल बोलताना तितिक्षा म्हणाली . या मालिकेत मी नेत्राची भूमिका साकारत  आहे. नेत्रा भविष्यात घडणाऱ्या  गोष्टींबद्दल बोलते. पण गावातील लोक तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नवीन आव्हानाला सामोरे जावे लागते. तसेच तितिक्षा म्हणाली की ही एक अलौकिक भूमिका आहे जी ती पहिल्यांदा करत आहे. या कथेनुसार माझ्यावर देवीची कृपा आणि वरदान आहे त्यामुळे ती पुढे घडणाऱ्या घटना आधीच पाहू शकते”. या मालिकेत नेत्रा च्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळी वळण येणार आहेत आणि ते पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading