Friday, September 11, 2026
BusinessLatest News

डाबर रेड पेस्टचे नवीन ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर बनले अमिताभ बच्चन

पुणे: डाबर इंडिया लिमिटेड या भारतातील आघाडीच्या व वैज्ञानिक दृष्टीकोणातुन कार्यरत आयुर्वेद कंपनीने आज ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. ते ओरल केयर ब्रॅंड डाबर रेड पेस्टचे नवीन ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर बनले आहेत.
या औचित्यावर ओ अ‍ॅण्ड एम ने तयार केलेल्या टीव्ही जाहिरातीचे देखील प्रेक्षेपण करण्यात आले. या जाहिरातीत अमिताभ बच्चन प्रेक्षकांना सांगत आहेत की कश्या प्रकारे डाबर रेड टूथपेस्ट आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेदीक गुणांनी परिपूर्ण आहे. जाहिरातीत अमिताभ बच्चन दुहेरी भूमिका साकारत आहेत, एक विज्ञान पुरुष आणि दुसरा आयुर्वेद तज्ञ. या आगळ्यावेगळ्या अवतारात त्यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने हा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला की डाबर रेड पेस्ट हे आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेदाचे परिपूर्ण मिश्रण आहे. ही नवीन जाहिरात लवकरच टेलिव्हिजन स्क्रीनवर प्रसारित केली जाईल आणि अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील लाइव्ह प्रसारित होईल. याप्रसंगी बोलताना, डाबर इंडिया लिमिटेडचे सीईओ मोहित मल्होत्रा म्हणाले, “आम्हाला आनंद होत आहे की ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आता डाबर रेड पेस्टचा नवा चेहरा बनले आहेत. डाबर रेड पेस्ट ही पारंपारिक आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाचे परिपूर्ण मिश्रण आहे, जे आमच्या ग्राहकांना संपूर्ण ओरल हायजीन प्रदान करते. अमिताभ बच्चन यांनी आपल्या लोकप्रियतेतुन, विश्वासार्हतेतुन आणि तरुण व वृद्धांशी संपर्क साधण्याच्या अतुलनीय क्षमतेद्वारे डाबर रेड पेस्ट या ब्रँडच्या मूल्यांना मूर्त स्वरूप दिले आहे, डाबर कुटुंबात आम्ही त्यांचे मनापासुन स्वागत करतो. आम्हाला खात्री आहे की त्यांच्यासोबतची ही भागीदारी आमची ब्रँड पोजिशन आणि ग्राहकांसोबतचे आमचे नाते आणखी मजबूत करेल.” या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना अमिताभ बच्चन म्हणाले, “डाबर रेड पेस्टला एंडोर्स करताना मला खूप आनंद होत आहे. हा डाबरचा विश्वासार्ह ब्रँड आहे, आपल्या सर्वांना माहित आहे की चांगल्या आरोग्यासाठी ओरल हाइजीन खूप महत्वाची असते, आणि डाबर रेड पेस्ट आयुर्वेदिक टूथपेस्ट असल्याने मौखीक आरोग्यासाठी खुप महत्वाची आहे.” पीयूष पांडे (अध्यक्ष, ग्लोबल क्रिएटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह चेअरमन, ओगिल्वी इंडिया) म्हणाले, “अमिताभ बच्चन यांच्यासोबत कामाचा अनुभव नेहमीच खास राहिला आहे. आम्हाला त्यांच्याशी जोडण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. डाबर रेड पेस्ट हा भारताचा आवडता ब्रँड आहे आणि डाबरने आजतगायत स्वताला नेहमी मजबूतीने स्थापित केले आहे. आम्हाला खात्री आहे की अमिताभ बच्चन यांच्यासोबतची भागीदारी आम्हाला आणखी जास्त नावलौकिक देऊन यशाच्या शिखरावर नेईल.”
 
अभिषेक जुगरान, व्हाईस प्रेसीडेन्ट – मार्केटिंग, डाबर इंडिया लिमिटेड म्हणाले, “डाबर रेड पेस्ट ही आमचा प्रमुख ब्रँड आहे जी वर्षानुवर्षे चांगल्या मार्केट शेयर सोबत ‘देश का लाल’ म्हणून ओळखली जाते. आम्हाला हा ब्रँड भारतातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवायचा आहे, म्हणूनच आम्ही देशातील सर्वात मोठे सुपरस्टार – मिस्टर बच्चन यांच्यासोबत ही नवीन मोहीम घेऊन आलो आहोत. जगातील नंबर १ आयुर्वेदिक टूथपेस्ट डाबर रेड पेस्ट ही आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाच्या मिश्रणाने समृद्ध असुन तुमच्या तोंडाच्या स्वच्छतेसाठी कश्या प्रकारे योग्य उपाय आहे हे या कॅम्पेनद्वारे सांगण्यात येत आहे. या मार्केटिंग कॅम्पेनद्वारे आम्ही डाबर रेड पेस्टला टीव्ही व डिजिटल माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचवू.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading