Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

ज्ञानाच्या जोरावर भारत देश जगावर राज्य करेल – डॉ. रामचंद्र देखणे

पुणे : जगातील सर्वात मोठे सामर्थ्य ज्ञान आहे. भारताला पाच हजार वर्षांची शिक्षकांची परंपरा लाभली आहे. जगातील कोणत्याही देशात हे पाहायला मिळणार नाही. प्रत्येक ऋषीचे आश्रम ही प्रयोगशाळा होती या आश्रम शाळांमध्ये अनेक शोध लागले. याच जोरावर भारत देश एक दिवस जगावर राज्य करेल. असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक प्राध्यापकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार पेठेतील संस्थेच्या श्रीमंत खासे साहेब महाराज पवार सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी देखणे यांच्या हस्ते शिक्षक आणि प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, सोसायटीचे,नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, पद्माकर पवार आणि सोसायटीचे सभासद यावेळी उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, सर्वात श्रीमंत माणूस शिक्षक असतो. जगातल्या श्रीमंतीचे लक्षण म्हणजे भरपूर कमावणारा परंतु कर्जात बुडलेला परंतु शिक्षक जितके ज्ञान देतो, तितके ते ज्ञान वाढत जाते. शिक्षकांनी शिकवताना तांत्रिक बाजूने नाही तर भावनिक बाजूने त्याकडे पाहिले पाहिजे. शिक्षणातून कुटुंब एकत्र यायला पाहिजे देशभक्ती जागवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित गोगावले यांनी केले. सुरेखा खानविलकर यांनी प्रास्ताविक तर शुभांगी पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading