ममतानगर मित्र मंडळाची आकर्षक देखणी मूर्ती व रोषणाई करतेय गणेश भक्तांना आकर्षित
पिंपरी : जुनी सांगवीतील ममतानगर मित्रमंडळ यंदा विसावे वर्ष साजरे करीत असून, आकर्षक गणेशमूर्ती आणि रोषणाई गणेश भक्तांना आकर्षित करीत आहे. मंडळ साधेपणाला प्राधान्य देत आलेले आहे. छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव हे या मंडळाचे आधारस्तंभ आहेत.
ममतानगर मित्र मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविते. यंदा मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. कमानीवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा लक्ष वेधून घेतात. छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव हे या मंडळाचे आधारस्तंभ आहेत. तर अभिषेक जाधव, आदेश गायकवाड, अतुल आबनावे, अभिजित आबनावे, अनिष नायर, अनुप पनिकर, प्रवीण कांबळे, प्रशांत शास्त्री, गणेश कोळी, योगेश खुडे, नरेन गंगावणे, अल्विन पिल्ले, उमेश गंगावणे आदी मंडळाचे सदस्य आहेत.
दरवर्षीप्रमाणे ममतानगर मित्र मंडळाने आकर्षक कापडी कमान साकारली आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने तेजोमय प्रकाशात गणपती मूर्ती उजळून निघालेली आहे. आकर्षक श्रीगणेशाची मूर्ती हेही मंडळाचे वेगळेपण आहे. या ठिकाणी भक्तिमय वातावरण दिसून येत आहे.
विविध परिसरातून बालचमू, नागरिक दर्शनासाठी येत असतात. मंडळाची दरवर्षी विसर्जन मिरवणूकही डोळ्याचे पारणे फेडणारी असते. मंडळाने कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, पूरग्रस्तांना मदत आदी विविध उपक्रम राबविले आहेत. समाजसुधारक व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम घेण्यात येतात. एकंदरीत ममतानगर मित्र मंडळ कोणतीही कसर न ठेवता जल्लोषात व उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
