Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

बाबुराव पाचर्णे, विनायक मेटे यांची शोकसभा चंदननगर येथे संपन्न


पुणे : शिरूर हवेलीचे दोन वेळा महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले लोकनेते दिवंगत बाबुराव काशिनाथ पाचर्णे व मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केलेले आमदार कै.विनायक मेटे साहेब या दोन्ही दिग्गज नेते हरपले अशा या लोकनेत्यांना अभिवादन करून भावपुर्ण आदरांजली वाहण्यासाठी वडगाव शेरी चंदन नगर भागातील आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी नागरीक, राजकीय, तसेच सामाजिक क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीशजी मुळीक, पुणे जिल्हा भाजपा कायदा आघाडी अध्यक्ष संजय सावंत पाटील, भाजप नेते कैलासराव सोनवणे, भाजप पुणे जिल्हा सचिव अनिल नवले, मनसे शहर उपाध्यक्ष हेमंत आबा बत्ते, राष्ट्रवादी नेते आबासाहेब पर्हाड, शिवसेना नेते रविंद्र गायकवाड, ज्येष्ठ वकील ॲड. पंडीतसर कापरे, ज्येष्ठ वकील ॲड. अशोक सर संकपाळ, ॲड. राजेंद्र पठारे, बाळासाहेब पर्हाड, संपादक एम बी साकोरे, गणपतराव काळकुटे, दिपकभाऊ वाघचोरे, दसगुडे सर, अशोकराव मोहिते, माजी सरपंच धर्मराज वाजे, माजी सैनिक गायकवाड, अमोलदादा सोनवणे, रत्नाकर शेळके, अजय गलांडे, एकनाथ खेडकर, विक्रम येळवंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading