‘सिक्रेट ऑफ गावस्कर’च्या कलाकारांनी साजरा केला त्यांच्या यशाचा खास क्षण
क्राईम, रोमान्स, ऍक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राईम आणि थ्रिलरचा कॉकटेल घेऊन ‘सिक्रेट ऑफ गावस्कर’ ही नवीकोरी वेबसिरीज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधितच या वेबसिरीजने ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. ‘चंद्रा फिल्म एंटरटेनमेंट’ निर्मित आणि ‘व्हीमास मराठी’ प्रस्तुत दिग्दर्शक तेजस लोखंडे दिग्दर्शित ही क्राईम आणि ऍक्शनचा भरणा असलेली वेबसिरीज ‘व्हीमास मराठी’ या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या वेबसिरीजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली याचे औचित्य साधत ‘सिक्रेट ऑफ गावस्कर’ या वेबसिरीजच्या यशाचे नुकतेच धुमधडाक्यात सेलिब्रेशन करण्यात आले. तर या कार्यक्रमाला हरीश दुधाडे, संग्राम समेळ, ज्ञानदा रामतीर्थकर, शिल्पा नवलकर, मीरा सारंग या कलाकारांनी हजेरी लावली होती.
अभिनेता हरीश दुधाडे, संग्राम समेळ, मयूर पवार, रमेश चांदणे, अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, दीप्ती लेले, शिल्पा नवलकर, मीरा सारंग, सीमा कुलकर्णी, लतिका सावंत, राधा धरणे या तगड्या स्टारकास्टच्या दमदार भूमिका या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाची जादू या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतेय. दिग्दर्शक तेजस लोखंडे दिग्दर्शित लेखक अजिंक्य ठाकूर लिखित ही वेबसिरीज असून याच्या संकलनाची बाजू प्राची पाठारे हिने उत्तमरीत्या साकारली आहे. तर क्राईम सीनला कॅमेऱ्यात कैद करण्याची जबाबदारी शिवराज सातार्डेकर याने पेलवली आहे.
व्हीमास मराठीचे ऑथोराईज फ्रेंचायसी, आर्टिस्टोक्रॅटचे फिल्म्स प्रोडक्शन प्रा.लि चे डिरेक्टर श्री. साकेत सावंत यांनी, ‘व्हीमास मराठी’ बद्दल थोडक्यात माहिती दिली आणि चॅनलच्या भवितव्याबद्दलही सांगितले. चॅनलचा प्रवास वाढत असून भविष्यात चॅनलच्या अजून काही मोठ्या घोषणा होणार आहेत तसेच एंटरटेनमेंटची नवी दालने उघडणार आहेत, असे त्यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.
‘व्हीमास मराठी’च्या ‘सिक्रेट ऑफ गावस्कर’ वेबसिरीजच्या टीमने त्यांच्या यशाचे हे क्षण धुमधडाक्यात साजरे केले.
