Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशनचे विद्यार्थी करताहेत गणपती मंडळांसमोर पथनाट्याद्वारे जनजागृती

स्वच्छता, पर्यावरणाकडे विद्यार्थी वेधताहेत नागरिकांचे लक्ष

पिंपरी : अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेने गणेशोत्सवात स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून, प्रशालेचे विद्यार्थी सांगवीतील सर्व गणेशोत्सव मंडळांसमोर पथनाट्ये सादर करीत सामाजिक समस्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विद्यार्थी-विद्यार्थिनी सादर करीत असलेल्या पथनाट्यांना गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीचे लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये दरवर्षी गणेशोत्सवात वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यंदा विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर पथनाट्ये बसविली असून, ही पथनाट्ये सांगवी परिसरातील प्रत्येक गणपती मंडळासमोर सादर केली जात आहेत. पर्यावरण, स्वच्छता, ग्लोबल वॉर्मिंग, सामाजिक सुरक्षितता अशा विविध विषयांवर दररोज सायंकाळी गणपती मंडळांसमोर विद्यार्थी-विद्यार्थिनी पथनाट्ये सादर करीत आहेत. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करून या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. नागरिकांचे मनपरिवर्तन करणे गरजेचे आहे, हेच विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकवृंद, कर्मचारीही मोहिमेत सहभागी होत आहेत.
या पथनाट्य ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सामाजिक विषय मांडले आहेत. याबाबत संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी सांगितले, की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने पथनाट्याच्या माध्यमातून समाजमन बदलण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत आहेत.
संस्थेचे सचिव प्रणव राव यांनी सांगितले, की आज समाज प्रबोधनाची अनेक साधने उपलब्ध असली, तरी पथनाट्यांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती होत असल्याचे दिसते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading