Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुरंदरचे विमानतळ मूळ जागेवरच होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे प्रस्तावित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्वी ठरलेल्या जागेवरच होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पुणे शहरातील नवीन इमारतीचे भूमीपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या भूमीपूजन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,विमानतळाच्या सर्व परवानग्या या जुन्या जागेवरच्याच आहेत. त्यामुळे या विमानतळाची जागा बदलली जाणार नाही. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली
या विमानतळासाठी आवश्‍यक असलेली जागा संपादन करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांना देण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एका खासगी कंपनीकडून एक प्रस्ताव राज्य सरकारकडे प्राप्त झालेला आहे. मात्र या प्रस्तावावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. हा प्रस्ताव सादर केलेल्या खासगी कंपनीचे नाव मात्र त्यांनी सांगितले नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading