श्रेअंस डागा फाउंडेशन तर्फे मॅनिफेस्टेशन डीकोडेड कार्यक्रमाची घोषणा
पुणे : सजगता आणि ध्यानधारणेवर आधारित मॅनिफेस्टेशन डीकोडेड ह्या २८ दिवसांच्या मोफत व्यापक अभ्यासक्रम कार्यक्रमाची घोषणा श्रेअंस डागा फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. श्रेअंस डागा फाऊंडेशनने सुरू केलेला हा लाईव्ह ऑनलाइन मेगा मास्टर कोर्स आहे. पुरातन तत्त्वज्ञान, समकालीन तंत्रे आणि स्वाभाविक वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आजच्या जगातील प्रकटीकरण, सजगता आणि ध्यान यांविषयीच्या सर्व चर्चेची हा अभ्यासक्रम ही गुरूकिल्ली आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेतील हा अभ्यासक्रम ३ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणार आहे.
श्रेअंस आणि वरुण डागा या भावंडानी या अभ्यासक्रमाची रचना केली असून यातील सहभागी व्यक्तींना आत्मशोध, उपचार आणि परिवर्तनाचा प्रवास घडवून आणण्याच्या दृष्टीने तो शास्त्रीयदृष्ट्या तयार करण्यात आला आहे. सहभागी व्यक्ती या २८ दिवसांच्या कोर्ससाठी देणार असलेल्या दोन तासांमध्ये त्यांना आयुष्यातील एकमेवाद्वितीय अनुभव मिळावा, हे त्याचे ध्येय आहे. यातील प्रत्येक विषय सखोल, शास्त्रीय आधार असलेला आणि विविध जागतिक अध्यात्मिक गुरु व शास्त्रज्ञांचे सर्वोत्
लोकांना अध्यात्माचे विज्ञान शिकवून त्यांच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची स्वतःची अपेक्षित वास्तविकता निर्माण करण्यासाठी त्यांना सक्षम करणे हा फाऊंडेशनचा उद्देश आहे. फाऊंडेशनच्या वतीने या सत्रांचे नियमितपणे ऑनलाइन आणि ऑफलाइन आयोजन करण्यात येते. त्यातून लोकांना त्यांची खरी शक्ती शोधण्यास मदत होते.मानसिक आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यात लोकांना मदत करण्यासोबतच या अभ्यासक्रमात अधिक अर्थपूर्ण संबंध कसे विकसित करावेत, कामात आपली उत्पादकता कशी वाढवावी, लवचिक वृत्ती कशी वाढवावी आणि बाह्य परिस्थितीची पर्वा न करता आनंदाने कसे जगायचे हेही सहभागींना शिकविण्यात येईल.
बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आतच आहे, यावर श्रेअंस डागा फाऊंडेशनचा ठाम विश्वास आहे. अभ्यासक्रम जसजसा पुढे सरकतो तसतसे सहभागी स्वत:मध्ये खोलवर जातात. बरे करण्याची, परिवर्तन करण्याची आणि आपले इच्छित भविष्य घडवण्याची स्वतःची आंतरिक शक्ती ते शोधून काढतात. या अभ्यासक्रमात आचार, तत्त्वज्ञान, व्यायाम आणि उपायांचा एक संचच उपलब्ध आहे. प्रत्येक सहभागी त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करेल. ही लाईव्ह सत्रे इंग्रजी आणि हिंदीमध्ये असतील. त्यांच्या रेकॉर्डिंग सर्व सहभागींसोबत शेअर करण्यात येतील जेणेकरून ते त्या पुन्हा–पुन्हा पाहू शकतील.या कोर्समध्ये सामील होण्यासाठी इच्छुकांनी इव्हेंट्स डॉट श्रे
या लाँचबाबत बोलताना श्रेअंस डागा म्हणाले की लोकं त्यांना व्यग्र ठेवणाऱ्या किंवा किमान विचलित करणाऱ्या अनेक क्रियाकलापांचा समावेश असलेले अत्यंत दगदगीचे जीवन जगतात. व्यग्रतेते आनंद, गोंधळात शांतता आणि विचलनांमध्ये मजा शोधण्यासाठी ते धडपडत आहेत. ही पिढी कदाचित सर्वात व्यग्र आणि सर्वात कनेक्टेड आहे, पण ती सर्वात एकाकीसुद्धा आहे. हा कोर्स २८ दिवसांमध्ये विभागण्यात आला आहे कारण तो हा केवळ लोकांना सवयी लावण्यास मदत करत नाही तर समुदायाची भावना देखील वाढवतो.”
वरुण डागा म्हणाले की लोकांना स्वतःबाबत समाधानी राहायलाही मदत करतो. त्यात साधने, तंत्रे, व्यायाम उपलब्ध करून दिली जातात. त्यांचा वापर ते स्वतःला जमीनीवर ठेवण्यासाठी, स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यासाठी, हातातील कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आपल्या आवडींवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी करू शकतात. प्रत्येक सत्रानंतर सहभागींना प्रश्न विचारण्यास आणि त्यांचे अनुभव समुदायासोबत शेअर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. यामुळे प्रत्येक सदस्याला आपुलकीची आणि सौहार्दाची भावना मिळते.
