fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे महापालिकेचे विभाजन होणे गरजेचे – चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे महापालिकेचे क्षेत्र वाढत आहे. आधी यामध्ये 11 गाव समाविष्ठ केलीहोती. त्यानंतर पुन्हा  23 गाव समाविष्ठ करण्यात आली. त्यामुळे पुण्याचे भौगोलीक क्षेत्र हे देशातील कोणत्याही महापालिकेपेक्षा मोठे झाले आहे. या समाविष्ट गावातील नागरिकांना सोई सुविधा द्यायच्या असतील तर पुणे महापालिकेचे विभाजन करण्याची गरज आहे, असे मत उच्च,तंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केले.

ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने उच्च,तंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष-ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, पुणे शहर अध्यक्ष पंकज बिबवे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पुणे हे सुरक्षीत शहर आहे. त्यामुळे जेव्हडे युनिट लहान तेव्हडा त्याचा विकास लवकर व सहज होतो. त्यामुळे पुणे महापालिकेचे दोन भाग होणे गरजेचे आहे.

पत्रकारांचे ‘ड्यूटी आवर्स’ ठरवा 

चंद्रकांत पाटील म्हणाले, माध्यम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे पत्रकारांना 24 तास काम करावे लागत आहे. अलीकडे पत्रकारांमध्ये महिलांची संख्याही मोठी आहे. याची दाखल घेवून पत्रकारांचे ‘ड्यूटी आवर्स’ ठरवण्याची गरज आहे. तसेच त्यांना स्थैर्य देण्यासाठी ही पत्रकारांच्या संघटनांनी काम करणे गरजेचे आहे,

नवोदित पत्रकारांसाठी कार्यशाळा गरजेची  

अलीकडचे पत्रकार जणूकाही एखाद्याची सुपारी घेतल्यासारखे वार्तांकन करताना दिसतात.अशा पत्रकारांना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. नवोदित पत्रकारांसाठी ज्येष्ठ पत्रकारांच्या कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. जेणेकरून प्रशिक्षणार्थी पत्रकारांना त्यांच्या अनुभवातून अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. तसेच सध्यस्थितीत खऱ्या पत्रकाराची गरज का आहे? याचे महत्त्व पटेल. यामुळे मुंबई पुण्यातील पत्रकारांना एक व्हिजन देण्याचे काम होईल. त्याच बरोबरीने इतर जिल्ह्यातील पत्रकारांना एक व्यासपीठ उपलब्ध होईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading