“बप्पांच्या मनातल” या उपक्रमातुन १० दिवस सामाजिक जागरूकता
पुणे : येवले अमृततुल्य तर्फे यंदाच्या गणेशोत्सवा निमित्त खास उपक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे , या मोहीमेचे नाव आहे “बाप्पांच्या मनातलं”. ज्यात सलग १० दिवस, पुण्यात विविध ठिकाणी, विवध मार्गांवर सामाजिक जागरूकता निमार्ण करणारे संदेश देण्यात येतील. या विविध सामाजिक उपक्रमांमधून येवले ग्रुप सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे उपक्रम गणेशोत्सवाच्या सुरूवातीपासुन ते गणेशोत्सवाच्या समाप्ती पर्यंत आयोजित केले जातील.
यात दररोज वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांना अनुसरून जनजागृतीचे संदेश दिले जातील , यात पहिल्या दिवशीचा मुद्दा होता ट्राफिक पोलिसांबद्दल जागरूकता निर्माण करणे.पहिल्या दिवशी मी पण मुकुट घालतो तुम्ही पण हेल्मट घाला, रांत्रदिवास आपल्यासाठी उन पावसात उभा राहून कार्य करणार्या ट्रॅफिक पोलीसांना सहकार्य करा. अश्या प्रकारचे संदेश देण्यात आले. याचप्रकारे दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या कार्यासाठी सामाजिक संदेश देण्यात येईल, तिसर्या दिवशी महिला सशक्तिकणाचा संदेश , चौथ्या दिवशी गणेशोत्सवाचे महत्त्व समजून सांगितले जाईल, अशा प्रकारे वेगवेगळे दहा मुद्दे आहेत जे रोज अशा समाजिक संदेशाद्वारे द्वारे देण्यात येतील, यासाठी येवले ग्रुपची संपूर्ण टीम कार्यरत आहे.
येवले ग्रुप गणपती बाप्पा मार्फत विविध सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. जसे की बाप्पा नेहमी भक्तांचे म्हणने ऐकून घेतो तर बाप्पांच्या मनात काय आहे हे आता बाप्पा सांगतील. ही मोहीम संपुर्ण पुण्यात व पिंपरी चिंचवड मध्ये वेगवेगळ्या मार्गांवर आयोजित केली जाईल .
