Ganeshotsav 2022 – गणेशोत्सव कालावधीत पीएमपीएमएल कडून जादा बसेसचे नियोजन
पुणे : श्री गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई/सजावट
पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या कारणास्तव प्रवासी नागरीकांचे सोयीकरीता प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही
पुणे महानगर परीवहन महामंडळाकडून दि. ३१/०८/२०२२ ते दि. ०९/०९/२०२२ या कालावधीत पहिल्या टप्प्यामध्ये
दि. ०१/०९/२०२२ ते दि. ०२/०९/२०२२ व दि. ०८/०९/२०२२ रोजी १६८ बसेस जादा म्हणुन व दुसऱ्या टप्प्यामध्ये
प्रवाशी गरजे नुसार दि. ०३/०९/२०२२ ते ०७/०९/२०२२ व दि. ०९/०९/२०२२ या काळात गणेशोत्सवाकरीता जादा
६५४ बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.
नागरिकांचे वाहतुकीचे सोयीसाठी खाली नमूद केलेल्या स्थानकावर प्रवासी गर्दीनुसार या कालावधीत खास
बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीमध्ये रात्री १० वा. नंतर बंद राहणार असून रात्री १० वा. नंतर सर्व बसेस
यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहणार आहेत.
रात्रौ १०.०० नंतर बससेवेसाठी प्रचलित दरामध्ये रूपये ५/- जादा दर आकारणी करण्यात येईल.
गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्रौ बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांस रात्रौ
१२.०० वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत.
श्री गणेशोत्सव कालावधीत शहर विभागातील रस्ते सायंकाळी पोलीस खात्याकडून बंद ठेवले जातात त्यामुळे
शहराच्या आतील भागातील बससेवा पर्यायी मार्गाने चालु ठेवण्यात येईल.
गणेशोत्सव कालावधीत खाली दर्शविलेल्या तक्त्यामधील बसस्थानकांवरून त्या समोर दर्शविलेल्या ठिकाणांपर्यंत
रात्रौ गरजेनुसार बससेवा देण्यात येणार आहे.
अ.क्र स्थानकाचे नाव बसमार्ग / शेवटचे ठिकाण
१. स्वारगेट बस स्थानक कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, नऱ्हे, आंबेगांव, जांभुळवाडी,
अप्पर इं नगर, मार्केटयार्ड, सांगवी, आळंदी.
२. नटराज हॉटेल / सिंहगड रोड वडगांव, धायरी व गरजेनुसार सिंहगड, खानापुर.
३. स्वारगेट डेपो बस स्थानक हडपसर, कोंढवा हॉस्पीटल.
४. महात्मा गांधी बस स्थानक कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक , साळुंके विहार.
५. हडपसर गाडीतळ बस स्थानक स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, ऊरूळी कांचन, मांजरी,
थेऊर, फुरसुंगी, देवाची ऊरूळी.
६. मोलेदिना हॉल / ससून रोड बस
स्थानक
विश्रांतवाडी, लोहगांव, वाघोली, विमाननगर, वडगांव शेरी, आळंदी.
७. डेंगळेपुल बस स्थानक लोहगांव, वडगांवशेरी, मुंढवागांव/केशवनगर, शुभम सोसायटी, आनंद
पार्क, तळेगांव ढमढेरे, हडपसर.
८. म.न.पा.भवन मुख्य बसस्थानक
व पेट्रोल पंप
भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देहूगांव, विश्रांतवाडी,
पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगेगांव, तळेगाव दाभाडे,
सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी रेल्वे स्टेशन.
९. कॉंग्रेस भवन बस स्थानक कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, कोथरूड डेपो.
१०. डेक्कन जिमखाना / संभाजी पूल
कॉर्नर
कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, गोखले नगर, कोथरूड डेपो.
११. कात्रज बस स्थानक स्वारगेट करीता.
१२. म.न.पा. पंप बस स्थानक बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुसगांव करीता.
१३. अप्पर डेपो बस स्थानक स्वारगेट करीता.
१४. धनकवडी बस स्थानक स्वारगेट करीता.
१५. निगडी बस स्थानक म.न.पा. भवन करीता.
१६. भोसरी बस स्थानक म.न.पा. भवन करीता.
१७. चिंचवडगांव बस स्थानक म.न.पा. भवन करीता.
दि. ०९/०९/२०२२ रोजी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक हा बंद होत असल्याने स्वारगेट चौकातील
बस थांबे खालील प्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात येत आहेत.
अ.क्र मूळ बस स्थानकाचे नाव मार्ग तात्पुरते बसेस सुटण्याचे ठिकाण
१. शाहु महाराज स्थानक
(स्वारगेट)
सातारा रोडने कात्रज , मार्केटयार्ड
करीता
लक्ष्मी नारायण चौक
२. नटराज बस स्थानक सिंहगड रोडकडे जाणे करिता पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ)
बस थांबा
३. स्वारगेट स्थानका बाहेर सोलापूर मार्गे पुलगेट, हडपसर
करिता
वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ)
४. स्वारगेट स्थानका बाहेर भवानी पेठ, नानापेठ, रास्तापेठ
करिता
वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ)
रात्रौ २.०० वाजेपर्यंतच जादा बसेसचे संचलन सुरु राहील.
दि.०३/०९/२०२२ ते दि.०९/०९/२०२२ पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार स्वारगेट ते निगडी रात्रौ (यात्रेकरिता)
जादा बसेस सोडण्यात येतील.
गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांच्या सोयीसाठी वरील प्रमाणे जादा बस संचलन करण्यात येणार आहे. तसेच
शहरातील मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवसभराच्या
संचलनामध्ये नेहमीच्या शिवाजीरोड, बाजीरावरोड, लक्ष्मीरोड, टिळकरोड या रस्त्यांवरून संचलनात असलेल्या बसेसच्या
मार्गामध्ये आवश्यकते नुसार बदल करण्यात येणार आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
——————————————————————————————————————————–
तसेच पिंपरी-चिंचवड शहरामधून पुणे शहरामध्ये गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी
संख्या पाहता पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बस स्थानकांवरून दरवर्षी
प्रमाणे यंदाही गर्दीनुसार रात्रभर बससेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने खालील ठिकाणांहून
सुटणाऱ्या बसेसचा नियोजन तक्ता खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. स्थानकाचे नाव बस संख्या
१ निगडी ६५
२ चिंचवडगाव ३५
३ भोसरी ६३
४ पिंपळे गुरव २०
५ सांगवी १५
६ आकुर्डी रेल्वे स्टेशन १६
७ चिंचवडगाव मार्गे डांगे
चौक
३०
८ मुकाई चौक रावेत १२
९ चिखली/संभाजीनगर १०
एकूण २६६
उपरोक्त नुसार २६६ बसेस या रात्रपाळीकरीता गणेशोत्सव कालावधीमध्ये वरील तक्त्यात नमूद स्थानकांवरून
संचलनात ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीमध्ये रात्रौ १०.०० नंतर बंद राहणार असून रात्रौ १०.०० नंतर सर्व बसेस
यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहणार आहेत.
रात्रौ १०.०० नंतर बससेवेसाठी प्रचलित दरामध्ये रूपये ५/- जादा दर आकारणी करण्यात येईल.
गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्रौ बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांस रात्रौ
१२.०० वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत.
गणेशोत्सव कालावधीत वर दर्शविलेल्या तक्त्यामधील पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बस स्थानकांवरून मनपा
भवन पर्यंत रात्रौ गरजेनुसार बससेवा देण्यात येणार आहे. तसेच मुख्य स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी
अधिकारी/कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे
आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
