डी.ई.एस.सेकंडरी शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
पुणे : टिळक रोड येथील डी.ई.एस. सेकंडरी शाळेत २९ ऑगस्ट रोजी ( हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस) राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. क्रीडा दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून डे.ए. सोसायटीच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, पर्यवेक्षिका विजया जोशी, क्रीडा शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी उपस्थित होते.
खेमराज रणपिसे यांच्या हस्ते विविध खेळांवर आधारित प्रकल्पांच्या प्रदर्शनाचे उद् घाटन लगोरी फोडून करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून स्मृतिचिन्ह, मैदानावरील वापरायची साधने, भारतातील दिले जाणारे खेळातील पुरस्कार, आशियाई स्पर्धा, विविध खेळांची मैदाने व खेळातील दुखापती आदी विषयांवर केलेले प्रकल्प लक्षणीय होते. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी क्रीडा साहित्याचे पूजन करून विद्यार्थ्यांबरोबर कॅरम खेळण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्रीडा शिक्षिका सुनेत्रा वेदपाठक, सचिन घाडगे, प्रवीण जाधव यांनी विद्यार्थ्यांकडून प्रकल्प तयार करून घेतले. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका ज्योती बोधे, पर्यवेक्षिका सरिता स्वादी, विजया जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
