Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

आयएमडीआरचा ४७ वा पदवी प्रदान समारंभ

पुणे : सामाजिक विषयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सामाजिक उद्योजकता देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची असल्याचे मत उद्योजक आणि फुकॉनचे संस्थापक संजय इनामदार यांनी व्यक्त केले.

डीईएसच्या इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अण्ड रीसर्चचा (आयएमडीआर) ४७ वा पदवी प्रदान समारंभात इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत होते.

डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, संचालिका डॉ शिखा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. ऐश्वर्या चाचड हिला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.

कुंटे म्हणाले, तरुण उद्योजकांनी निर्यातीवर भर देणे आवश्यक आहे. चिनी वस्तूंना पर्यायी स्वदेशीचे उत्पादन करण्यावर भर दिला पाहिजे. नागरिकांनी स्वदेशी वस्तू करुन उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

संचालिका डॉ. शिखा जैन यांनी प्रास्ताविक आणि उपाध्यक्ष महेश आठवले यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading