Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNE

महागाईच्या विषयात केंद्रसरकार असंवेदनशील – खासदार सुप्रिया सुळे

पुणे: केंद्र सरकारने दोन तीन वर्षापासून महागाई वाढवली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, सीनजी,घरगुती गॅस च्या दरात केलेली वाढ,घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेली GST ची वाढ झाली आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षापासून विरोधी पक्ष महागाई विरुद्ध सतत आंदोलन करत आहे. त्याचा आज निषेध करण्यासाठीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आज पुण्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पी.एम. टी. बस डेपो, भुसारी कॉलनी, कोथरूड येथे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्तेप्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्ष मृणाल वाणी, रूपाली पाटील ठोंबरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या
महिला पदाधिकारी व कार्यकर्ते पुणेशहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,पेट्रोलवरील 5 रुपये कमी करून काही होणार नाही.सरकारने कमीच करायचे असेल तर 100,200 रुपये कमी करावेत.
भाजी पाला ते मेडिकलपर्यत केंद्र सरकारने महागाई करून ठेवली आहे. या महागाईमधून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे.मात्र हे सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही.
महागाईच्या विषयात सरकार असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महागाईमुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात असतानादेखील केंद्र या विषयात गांभीर्याने काहीच करायला तयार नाही, अशी टीका खासदार सुळे यांनी केली.
महागाईचा विषय देशातील सर्वसामान्य आणि मध्यमर्गीयांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, या विषयाकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहेत.असा आरोप खासदार सुळे यांनी केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या एक महिला असूनही महागाईमुळे महिलांना होणारा त्रास त्यांच्या लक्षात येत नाही, असे खासदार सुळे म्हणाल्या. लोकसभेत इतकी चर्चा झाल्यानंतरदेखील हे सरकार काहीच उपायोजना करायला तयार नाही. या सरकारला सामान्य माणसाच्या संवेदना कळत नाहीत. सामान्यांचे होणारे हाल सरकारच्या लक्षात येत नाहीत. अशी टीका खासदार सुळे यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading