Saturday, October 24, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आम्ही पंकजा मुंडे यांना ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरी यांच्या पाठीशी -खासदार सुप्रिया सुळे

पुणे : गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांनी केलेल्या कामामुळे भाजपा पक्ष वाढला. मात्र सुडाचे राजकारण करून भाजपनेत्यांच्याच मुलीचा पराभव केला गेला. रोहिणी खडसे यांना हे लक्षात आले. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला हवे. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकरच मंजूर करणार आहेत. या यादीत पंकजा मुंडे यांचे नावही नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात, हेच यातून दिसून येते. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या. तशाच पंकजा मुंडे यांनीही पाऊल उचलावे.असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

त्यावर आज राष्ट्रवादीचे नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीआहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख भाजपामध्ये छाटले जातात. असे म्हणत पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरी यांच्या आम्ही पाठीशी आहोत. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात मोठी आणि वेगळी ओळख आहे. जरी ते वेगळ्या पक्षात होते मात्र आम्हा सर्वांचेच वैयक्तिक संबंध अतिशय चांगले होते. तो काळच असा होता, आणि महाराष्ट्राची ही परंपरादेखील आहे, की जरी तुम्ही वेगळ्या पक्षात असाल, वैयक्तिक संबंध पाळलेच पाहिजेत. आता कुठेतरी कटुता वाढताना दिसत आहे. हे दुर्दैवी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अमोल मिटकरी यांना जर एखादा चांगला विचार मांडला असेल तर पक्ष जरूर त्या संदर्भाने विचार करेल. पंकजा मुंडे ही महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान महिला आहे. त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी माझ्या नेहमीच त्यांना शुभेच्छा आणि प्रेम आयुष्यभर असेल.असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading