Saturday, October 24, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजपने देशाच ऐक्य आणि संविधान धोक्यात आणले – सुप्रिया सुळे

पुणे: राज्यात महाविकास आघाडी मधील मंत्र्यांवर भाजप केंद्रीय यंत्रणा व ईडी यांचा वापर करून महा विकास आघाडी मधील मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकत आहेत. त्यावर ही दुर्दैवाची गोष्ट असून देशासाठी धोक्यांची घंटा आहे. राजकीय व्यक्तीना यांनी नोटिसा पाठवल्या नाहीत. तिथेच केंद्र सरकार थांबल नाही. पत्रकारांना देखील नोटिसा पाठवल्या आहेत.त्यामुळे देशाच ऐक्य आणि संविधान धोक्यात आल आहे. अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारवर केली.

आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने वाढवलेल्या इंधन दराव विरोधात राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या आंदोलनाला उपस्थिती लावली तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.
भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघावर आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना घेरण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.भाजपने ‘मिशन बारामती हाती घेतलं आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी निर्मला सीतारामन यांच मनापासून स्वागत करते.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नडा काय म्हणता एक पार्टी एक देश पण आमच त्याच्या बरोबर विरोधात मत आहे.आमचा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना नुसार चालणार पक्ष आहे.त्यामुळे एक देश आणि अनेक पक्ष राहिलेच पाहिजे.निर्मला ताई जेव्हा येतील, तेव्हा मी स्वतः स्वागत करेल त्यांनी त्यांचा पक्ष का वाढवू नये. आम्ही आमचा पक्ष वाढवावा.त्यांनी का वाढवू नये.त्यामध्ये गैर काय आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवक वसंत मोरे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,मनसे जर पाठवत असेल तर त्यांच पण स्वागत करेल मला या मतदार संघावर प्रचंड प्रेम आहे.तसेच बारामती तर प्रत्येकाला हवीहवीशी वाटते.त्याबद्दल जे पाहुणे येतात ते सर्टिफिकेट देत आहेत.त्याबद्दल मला मनापासून आनंद आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीचे वृत्त काही माध्यमामध्ये प्रसिद्ध झाले आहे. याबाबत सुळे म्हणाल्या, त्याची अजून चौकशी सुरू नाही.अशी बातमी चॅनेलवर आली आहे.चौकशी करणार अशी बातमी मी पाहिली आहे.त्यावर रोहित सोबत बोलणे झाल आहे. त्याला काही नोटीस आलेली नाही.आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली तर आमची सहकार्याची भूमिका राहिली आहे. माझा न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे.त्यामुळे आम्हाला काही लपवयाची गरज नाही.त्यामुळे आम्हा कोणालाही नोटीस आलीच,तर कोणाला काही अडचण येईल.असे काही प्रसंग आले तर आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ . असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.
त्यांनी चौकात वाहतुकीचा प्रश्न हा सतत नागरिकांना खेड सावत मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसात हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे .त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,चांदणी चौकातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष यांच्याशी माझ बोलणे झाले आहे.चांदणी चौका मधील पूल पाडावा लागेल असे त्यांनी सांगितले.मात्र पूल पाडण्या अगोदर पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading