fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsSports

अल्टिमेट खो खो स्पर्धेत गुजरात जायंट्सच्या संघात महाराष्ट्राचा अभिनंदन पाटीलची लक्षवेधी कामगिरी

पुणे : पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत गुजरात जायंट्सने सुरेख कामगिरी करत चार सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.  
 
महाराष्ट्राच्या अभिनंदन पाटीलने यंदाच्या मौसमात गुजरात जायंट्स संघासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे.  21 वर्षीय कोल्हापूरचा अभिनंदन पाटील हा या स्पर्धेत 35 गुणांसह वझीरच्या अव्वल तीन खेळाडूंमध्ये आहे. तर, ओडिशा जुगरनट्सचा सुभाषिश संत्रा(38) आणि मुंबई खिलाडीजचा दुर्वेश साळुंखे(30)हे अल्टीमेट खो खो सीझन 1 मधील इतर दोन सर्वोत्तम कामगिरी करणारे वझीर आहेत. 

टच पॉईंटद्वारे 24 गुण मिळवणारा अभिनंदन पाटील म्हणाला की, “या लीगमधील अव्वल कामगिरी करणाऱ्यांपैकी एक असल्यामुळे मला चांगले वाटत आहे. मी टच पॉईंटद्वारे हे गुण मिळवले असून डाईव्हमध्ये देखील मी अधिक गुण मिळवू शकतो,”असा मला विश्वास वाटतो.  आमचा संघ हा समतोल संघ असून संघात वरिष्ठ व कुमार खेळाडूंचा योग्य समन्वय आहे. जरी आम्हांला मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी, पुढील सामन्यात आम्ही पुनरागमन करू.  
 
गुजरात जायंट्स संघाला रविवारी ओडिशा जुगरनॉट्सविरुद्धच्या लढतीत या मौसमातील आपल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले, परंतु तरीही गुजरात संघाला तीन गुणांऐवजी एक गुण मिळवून गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यशस्वी झाले.
 
2019 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या  भारतीय संघातील सदस्य असलेल्या पाटीलने सहा वेळा नाबाद राहून बचावातही उल्लेखनीय कामगिरी करता आली. मंगळवारी, गुजरात जायंट्स विरुद्ध चेन्नई क्विक गन्स यांच्यात सामना होणार असून दुसरा सामना मुंबई खिलाडीज विरुद्ध तेलगू योद्धाज यांच्यात दुसरा सामना होणार आहे. 
 
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading