Friday, May 15, 2026
Latest NewsSports

२२ यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट क्लब संघांची विजयाची हॅट्रीक 

पुणे  स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत २२ यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ आणि स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयाची हॅट्रीक नोंदवली.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेत आर्यन पवार याच्या अष्टपैलू खेळीमुळे २२ यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १३१ धावांनी धुव्वा उडविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना २२ यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २३२ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये आर्यन पवार याने ५३ धावांची तर, शिवम गोरे याने नाबाद ६९ धावांची खेळी केली. पहिल्या गड्यासाठी आर्यन आणि सार्थक देशमुख यांनी ४१ चेंडूत ५७ धावांची भागिदारी केली व मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या आव्हानाला उत्तर देताना खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा संघ १०१ धावांवर मर्यादित राहीला.

सार्थ माळी याच्या खेळीच्या जोरावर स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट क्लबने सनराईझ क्रिकेट स्कूलचा ४ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सनराईझ क्रिकेट स्कूलने शौनक राजे (४० धावा) आणि रोहीत यादव (२० धावा) यांच्या फलंदाजीमुळे ११९ धावा जमविल्या. स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट क्लब हे आव्हान २४.५ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. सार्थ माळी याने नाबाद ३० धावा, रघुवीर राठोड (२५ धावा) आणि धु्रविल रायठा (१८ धावा) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
२२ यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २१ षटकात ४ गडी बाद २३२ धावा (आर्यन पवार ५३ (३८, ९ चौकार, १ षटकार), शिवम गोरे नाबाद ६९ (४०, ८ चौकार, ३ षटकार), निलमेघ नागवेकर २२, सार्थक देशमुख १७);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी आर्यन आणि सार्थक देशमुख ५७ (४१) वि.वि. खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २१ षटकात ५ गडी बाद १०१ धावा (मयुरेश मुदगल २२, मुस्तफा रफिक २०, आर्यन पवार १-४); सामनावीरः आर्यन पवार;

सनराईझ क्रिकेट स्कूलः २९.२ षटकात १० गडी बाद ११९ धावा (शौनक राजे ४० (५७, ५ चौकार), रोहीत यादव २०, सोहम मोहीते ३-२४, सार्थ माळी २-१०) पराभूत वि. स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट क्लबः २४.५ षटकात ६ गडी बाद १२० धावा (सार्थ माळी नाबाद ३०, रघुवीर राठोड २५, धु्रविल रायठा १८, रोहीत यादव ३-२४); सामनावीरः सार्थ माळी;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading