Saturday, September 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

“द ट्रॅप” वेब सिरीजचे पोस्टर अनावरण

दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांची थरारक आणि रहस्यमय कथेवर आधारित असणारी ‘द ट्रॅप’ या वेबसिरीजचे पोस्टर अनावरण करण्यात आले आहे.
सध्या शहरामध्ये नाईट लाईफ ही संस्कृती मोठ्या प्रमाणात तरुणाईला भुरळ घालत असून यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. याच नाईट लाईफमध्ये पबिंग, पार्टी आणि मौज मस्ती ही तरुणाईच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. याचं नाईट लाईफच्या संस्कृतीच्या चक्रव्यूहात एक तरुणी कशी अडकते. ती कशी ट्रॅप होते. हे या वेबसिरीजमध्ये रसिकांना पहायला मिळणार आहे. थरारक आणि रहस्यमय असणारी ही वेब सिरीज लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.

‘द डार्क शाडो मोशन पिक्चर्स’ या प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या वेब सिरिजमधून जानकी आर ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. त्याच बरोबर रामकुमार शेडगे, आशुतोष भोसले, केतन पेंडसे, सँडी, अमोल भगत असे अनेक कलाकारांचा अभिनय रसिकांना पहायला मिळेल. या सिरीजचे कॅमेरामन आकाश भापकर यांनी केले आहे. तर लेखन – दिग्दर्शक रामकुमार शेडगे हे आहेत.

या अगोदर रामकुमार शेडगे यांनी अ.ब.क या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यामध्ये प्रसिद्ध कलाकार सुनील शेट्टी, तमन्ना भाटिया असे हिंदीतील दिग्गज कलाकार होते. तर अनेक चित्रपट महोत्सवात चित्रपटाला पुरस्कार मिळाले होते. द ट्रॅप ही वेब सिरीज रसिकांना आवडेल असे रामकुमार शेडगे यांनी संगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading