काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्याने 30 वर्षानंतर लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा मान मिळाला – तेजस्वी सुर्या
पुणे : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मिळून म्हणजेच कलम ३७० हटवून तीन वर्षे झाली. तरीसुद्धा पाकिस्तान कडून सातत्याने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जातो. शिवाय काश्मीर मध्ये 370 कलाम हटवल्यानंतर तिरंग्याचा मान वाढला आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तब्बल 30 वर्षानंतर लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा मान मिळाला आहे, अशी भावनीक प्रतिक्रिया भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष व खासदार तेजस्वी सुर्या यांनी दिली. त्यांनी आज पुण्यात भाजप युवा मोर्चा द्वारे आयोजित ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
तेजस्वी सूर्या म्हणाले, जे लोक स्वतंत्र लढ्यात आरएसएसचे योगदान? विचारत असतील, तर भाजप युवा मोर्चा त्याच विशेष वर्ग भरवून इतिहास सांगून त्याच्या ज्ञानात भर घालू इच्छितो. भारताच्या स्वातंत्र्य मध्ये सर्वाच योगदान आहे का आता प्रश्न पत्रकारांनी सूर्या यांना विचारला असता. ते म्हणाले,देश एक ठेवण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत.
