fbpx

अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर; कार्यकर्त्यांनी १५ फुटी हार घालून केले जंगी स्वागत

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता ते कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर तीन दिवस पुणे दौऱ्यावर आले असून त्यांच्या पुणे संपर्क दौऱ्याला सुरुवात झाली आहे. राजमहाल या निवस्थानी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडूनअमित यांचे आज जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी अमित यांचा हा दौरा निश्चित करण्यात आला आहे. आज पुण्यात दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे यांचा १५ फुटाहून मोठा हार घालत कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

अमित ठाकरे यांनी मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाची सुरूवात केली असून त्यांनी राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर आता ते तीन दिवस पुणे दौऱ्यावर आले आहेत. आता १४ ऑगस्ट पर्यंत अमित ठाकरे हे पुणे शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहे. यामध्ये ते महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी हा दौरा निश्चित करण्यात आला आहे. तसेच ठाकरे हे या दौऱ्यादरम्यान सर्व मतदार संघात जाऊन पक्ष बांधिलकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणूका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या तब्येतीमुळे त्यांना मर्यादा येत आहेत. मात्र अमित ठाकरे हे पक्षाच्या पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षबांधणी मजबूत करतांना दिसत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: