अब्दुल सत्तार यांना शालेय शिक्षण मंत्री करा -राष्ट्रवादी महिला काँग्रेस
पुणे:सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं टीईटी पेपर घोटाळ्यात नाव सापडल्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टीने अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री करा या मागणीकरीता आंदेलन केले आहे.
हे आंदोलन राष्ट्रवादी महीला काँग्रेस प्रदेशाघ्यक्ष व आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतूत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख,वैशाली नागवडे विभागीय महिलाध्यक्षा,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष,मृणाल वाणी
दिपाली धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विद्या चव्हाण म्हणाल्या,काही महिन्यांपूर्वी या महाराष्ट्र मध्ये प्रचंड मोठा टीईटी घोटाळा उघडकीस आला .
आज आमदार अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत या घोटाळ्याचे धागेदोरे पोचत आहेत अशा बातम्या अनेक ठिकाणी वाचावयास आणि पाहायला मिळत आहेत . हे सरकार ईडिच सरकार आहे.
हे चाळीस आमदार गेलेलेसगळे गद्दार आहेत. गद्दारांकडून काय अजून अपेक्षा करायची. ते आपल्याच घराच भर करणार. अब्दुल सत्तार यांना शालेय शिक्षण मंत्री करा अशी आमची मागणी आहे. अशा विद्या चव्हाण म्हणाल्या.
