Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही – जयंत पाटील

पुणे : अजित पवारांकडे विरोधी पक्षाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार का. अशा चर्चा रंगून आल्या. त्यावर मी अलिप्त नव्हतो. माझ्या मतदारसंघात पूर्णवेळ बैठका घेत होतो.मी पक्षाच्या अध्यक्ष आहे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. असे राष्ट्रवादीचे नेते  जयंत पाटील हे पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

पुणे शहर सर्व विधानसभेतील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. त्याला जयंत पाटील यांनी आज उपस्थिती लावली तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला‌.
जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिंदे फडणवीस सरकारला एक-दीड महिना पूर्ण झाला तरी. या सरकारचेमंत्रिमंडळ अजूनही स्थापन झाले नाही. त्यावर जयंत पाटील म्हणाले,आज 36 दिवस झालेत मंत्रीमंडळ विस्तारावर काय प्रतिक्रिया द्यायची .जनता बघतेय. या दोघांनी सातशे ते साडे सातशे निर्णय यांनी घेतला. घाबरून जाऊन प्रभाग रचना बदलल्या आहेत . असा टोला जयंत पाटील देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना लगावला.
राज्यात नवीन स्थापन झालेल्या भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन जे निर्णय घेतले आहेत. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिले आहेत. त्यावर जयंत पाटील म्हणाले,भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन जे निर्णय घेतले आहे .त्याला समर्थन आहे की नाही यासाठी निवडणूका घाव्यात. अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
मंत्रिमंडळाचे अधिकार सचिवांना देण्याच्या निर्णयावर जयंत पाटील म्हणाले,मंत्र्यांचे अधिकार सचिवांना हॅन्डओव्हर केले .असे मी कधी ऐकलं नाही.मंत्री नेमण्याची ज्यांची क्षमता नाहीय.कायदा धाब्यावर बसवून सरकार चालत आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी शिंदे व फडणवीस सरकार वर केली.
शिवसेना नक्की कोणाची यावर सुप्रीम कोर्टात अजूनही सुनावणी सुरू आहे. महा विकास आघाडी मधील नेते उद्धव ठाकरे यांच्या साईटनेचा निकाल लागेल असा विश्वास व्यक्त करत आहेत.त्यावर जयंत पाटील म्हणाले,न्यायाधीशांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. जर न्यायच संपला असेल तर कुठे जायचे असा सवाल ही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading