Sunday, June 14, 2026
BusinessLatest News

चीनला मागे टाकत, बजाज अलायन्झ लाइफ इन्श्युरन्सने GUINNESS WORLD RECORDS™ मध्ये नोंदवला नवा विक्रम 

दिल्ली  :   भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलायन्झ लाइफ इन्श्युरन्सने मोस्ट नंबर ऑफ पीपल होल्डिंग द अब्डॉमिनल प्लान्क पोझिशन अर्थात एकाचवेळी पोटावर प्लॅन्क स्थितीमध्ये राहिलेल्या लोकांच्या सर्वाधिक संख्येचा विक्रम मोडत नवी इतिहास रचला आहे. आज जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये पार पडलेल्या बजाज अलायन्झ लाइफ प्लॅन्केथॉनमध्ये 4454 लोकांनी एका मिनिटासाठी प्लॅन्क स्थितीमध्ये राहून दाखविले. याआधी या श्रेणीमध्ये चीनने केलेला 3,118 लोकांचा विक्रम मोडून काढत कंपनीने हे यश प्राप्त केले आहे.

या विश्वविक्रमाविषयी बोलताना बजाज अलायन्झ लाइफ इन्श्युरन्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर चंद्रमोहन मेहरा म्हणाले, “चांगले आरोग्य आणि सर्वांगिण स्वास्थ्य साध्य करण्याप्रती आमची बांधिलकी या प्लॅन्केथॉन उपक्रमामध्ये प्रतिबिंबित झाली आहे. #PlankToThank ही मोहीम आपली सैन्यदलांबद्दल – आपल्या खर्याखुर्या वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संकल्पित करण्यात आली आहे व या मोहिमेने भारतभरातून भरभरून प्रतिसाद मिळविला आहे व लोक प्रचंड संख्येने या मोहिमेमध्य सहभागी झाले आहेत. अधिक निरोगी आणि अधिक आनंदी भारतीय हीच भारताच्या जीवनध्येयांचा खरा इन्श्युरन्स आहेत.”

भारतासाठी पहिला ODI विश्वचषक जिंकणार्या संघाचे कर्णधार कपिल देव म्हणाले, “फिटनेसला प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि एका अनोख्या पद्धतीने या मंचाचा वापर करत आपल्या खरा वीरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल मी बजाज अलायन्झ लाइफ इन्श्युरन्सचे अभिनंदन करतो. आणखीही अनेक लोक या प्लॅन्क चळवळीशी जोडले जाताना आणि स्वत:साठी, स्वत:च्या प्रियजनांसाठी व भारतासाठी सर्वांगिण स्वास्थ्याचा स्वीकार करताना पाहण्यास मी उत्सुक आहे. ”

प्लॅन्केथॉनच्या सध्याच्या तिसर्या पर्वामध्ये केलेला नवा विश्वविक्रम हा कंपनीच्या 1 जुलै 2022 रोजी सुरू झालेल्या #PlankToThank उपक्रमाचा एक भाग होता. आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने भारतीय सैन्यदलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कंपनीने सोश्यल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून लोकांना आपले प्लॅन्किंग व्हिडिओ किंवा छायाचित्रे शेअर करण्याचे आवाहन केले होते. निवृत्त सैनिकांमध्ये उद्योजकतेला मदत करण्यासाठी कंपनीने आर्थिक योगदान दिले आहे.  तांत्रिक कौशल्ये पुरविणेबिझनेससाठी मार्गदर्शन

देणे आणि भांडवल उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टींचा समावेश असलेल्या पुन:कुशलन अर्थात रि-स्किलिंग कार्यक्रमाची अंमलबजावणी iCreate India  च्या सहयोगाने केली जाईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading