fbpx

टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी  सुशील खोडवेकर पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेत रुजू

पुणे : राज्यभर गाजलेल्या टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात आरोप असलेल्या आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचं निलंबन राज्य सरकारने रद्द केलं आहे. सुशील खोडवेकर यांना पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेत रुजू करुन घेण्यात आलं असून उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जर या खोडवेकरांनी पैसे घेऊन टीईटीमध्ये पास केलं त्या शिक्षकांवर कारवाई करायचा निर्णय होतो तर मग या खोडवेकरांना नियुक्ती कशी काय होऊ शकते? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.

टीईटी प्रकरणामध्ये अटक असलेले परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या संपर्कात असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सुशील खोडवेकर हे 2011 अधिकारी तथा कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. पूर्वी शिक्षण विभागात आस्थापनांमध्ये उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांनी तुकाराम सुपे यांना खात्यांतर्गत चौकशीमध्ये निर्दोष सोडले होते आणि जीए सॉफ्टवेअर या कंपनीस काळ्या यादीतून बाहेर काढण्याचा प्रताप केला. विशेष म्हणजे, या बदल्यात जीए सॉफ्टवेअरच्या अभिषेक सावरीकर यांच्याकडून खोडवेकरांनी पैसे घेतले, शिवाय तुकाराम सुपे यांच्या संपर्कात राहून अनेक मुलांना टीईटीमध्ये पास केल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालं होते.

Leave a Reply

%d bloggers like this: