fbpx

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा कॉंग्रेससाठी फक्त ‘इव्हेंट’ नसून स्वातंत्र्य चळवळीचा गौरव आहे – गोपाळदादा तिवारी 

सिंधुदुर्ग : ७५ वा स्वातंत्र्य दिन हा कॉंग्रेससाठी फक्त ‘इव्हेंट’ नसून स्वातंत्र्य चळवळीचा गौरव आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी कुडाळ (सिंधुदुर्ग जिल्हा) येथील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष इर्शाद शेख, तसेच माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, महीला अध्यक्ष साक्षीताई वंजारी, युवक अध्यक्ष किरण टेंबुलकर, ओबीसी अध्यक्ष महेश अंधारी, माजी जिल्हा पंचायत सभापती नागेश मोर्ये आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहासात महाराष्ट्राचे विशेष योगदान आहे स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांधी यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले हे महाराष्ट्राचे होते. इंग्रजाना सडेतोड स्वराज्याचा हक्क व अधिकार सांगणारे लोकमान्य टिळक महाराष्ट्राच्या कोकण भूमीचे सुपुत्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण परिसरात आज त्यांचेप्रती कॉंग्रेस कृतज्ञता व्यक्त करत आहेत. गेले वर्षभर कॉंग्रेस स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव विविध उपक्रमातून साजरा करीत आहे. मागील वर्षी “व्यर्थ न हो बलिदान तयाचे” पासून मुंबईतील ‘चलेजाव चळवळ’ ऑगस्ट क्रांती मैदान येथील स्मृतींना उजाळा देण्याचे व स्वातंत्र्य सैनिकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्याचे खरेखुरे कार्य कॉंग्रेसच वर्षभर राज्यात व देशात करत आली आहे. लोकशाहीरुपी स्वातंत्र्याचे भारतात घर कॉंग्रेसने बांधले ह्याचा उचित अभिमान व उत्तरदायित्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला असल्याचे प्रतिपादन देखील गोपाळदादा तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केले.

पुढे बोलताना तिवारी म्हणाले, विविध स्तरांवर व विविध द्रुष्टीकोनातून योग्य विचार होवून साधकबाधक चर्चा होवून ही राष्ट्रीय प्रतिके निश्चित करण्यात आल्यामुळे भारताचा तिरंगी ध्वज तीन रंगाचे प्रतिनिधित्व करत असून पावित्र्य,त्याग, चेतना, शांतता, सदभावना, बंधुभाव, हरीत क्रांती, समृद्धी, शौर्य, या सर्व गुणासह भारताचा तिरंगा प्रतिनिधित्व करतो. त्यामुळेच ‘हर घर तिरंगा’ लावण्याबरोबर देशात वरील गुणांचे साम्राज्य अबाधित ठेवण्याचे काम देखील राज्यकर्त्यांवर आहे. हे विद्यमान सरकारने विसरता कामा नये. त्यामुळे सदर तिरंगा लावताना त्या तिरंग्याचे मतितार्थ देखील समजणे व अंगिकारणे तेवढेच महत्त्वाचे आहे, असे देखील  प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: