fbpx

FTIIच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे : पुण्यातील फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ( एफटीआयआय) बॉईज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अश्विन अनुराग शुक्ला (३२, रा, गोवा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

आज (दी.5) सकाळी नऊच्या सुमारास एफटीआयआयच्या जुन्या हॉस्टेलमध्ये एस १२ बी ब्लॉक ही रूम आतून बंद असल्याचा फोन कॉल आला होता. त्यांनतर तत्काळ डेक्कन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा अश्विन अनुराग शुक्ला (वय 32) हा खिडकीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करून विद्यार्थ्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. डेक्कन पोलीस पुढील तपास करीत आहेत.   

 

Leave a Reply

%d bloggers like this: