fbpx

GST कार्यालय नव्हे ‘गब्बर सिंग टॅक्सऑफिस’; विद्यार्थी काँग्रेस कडून अनोखे आंदोलन  

पुणे : महाराष्ट्र प्रदेश NSUI आणि पुणे NSUI च्या वतीने पुण्याच्या GST ऑफिसला ‘गब्बर सिंग टॅक्स’चे बॅनर लाऊन निषेध व्यक्त करण्यात आला. मोदी सरकारने वाढवलेल्या प्रचंड महागाईच्या विरोधात निषेध केला. सामान्य माणूस वाढलेल्या प्रचंड महागाईमुळे त्रस्त आहे. त्यात मोदी सरकारने खाद्यपदार्थ जसे की दही, दूध, ताक, तूप, औषध, इत्यादी वस्तूवर GST लावून सर्वसामान्यांच जीवन जगन मुश्किल केलं आहे. लोकांच्या मनातील प्रचंड रोष विद्यार्थी काँग्रेस ने GST कार्यालयासमोर व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख , उपाध्यक्ष उमेश खंदारे, पुणे विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष भूषण रानभरे, सो. मि. प्रदेशाध्यक्ष अभिजात हळदेकर, सरचिटणीस संकेत गलांडे, सातारा जिल्हा अध्यक्ष रोहित झानझुरणे, प्रदेश प्रवक्ता अविनाश सोळुंके, प्रवक्ता निकिता बहिरट, सिद्धांत सरवाण सचिव संदेश टेम्भुरणे, सचिव नेहल देशमुख, परमेश्वर अंडील, राज जाधव, प्रफुल्ल पिसाळ जावेद शेख उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: