‘ऑपरेशन आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे: व्यवस्थापन विषयातील ‘ऑपरेशन आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या पुस्तकाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
चेतन दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे संचालक प्रा.डॉ.मिलिंद कुलकर्णी व पीएच.डी रिसर्च स्कॉलर हेमंत मोरे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, विजय सोनवणे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाचे प्रमुख प्रा.संजय ढोले, कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, अल्युमिनाय असोसिशनचे संपर्क प्रमुख प्रतीक दामा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, विजय सोनवणे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाचे प्रमुख प्रा.संजय ढोले, कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, अल्युमिनाय असोसिशनचे संपर्क प्रमुख प्रतीक दामा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.